मुलींचे शिक्षण


सर्व शिक्षा अभियान अंतर्गत मुलींचे शिक्षण अंतर्गत राबविण्यात आलेले उपक्रम
1.    ज्युदो कराटे -: मुलीना स्वरक्षणार्थ व आत्मनिर्भर बनविण्यासाठी जि.प. शाळेतील इयत्ता 5  वी ते 7वी तील  मुलींसाठी जिल्हास्तरावर ज्युदो कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. तसेच शाळास्तरावर ज्युदो कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.
2.     किशोरी हितगुज मेळावे -: मुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी तसेच मुलींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जिल्हास्तरावर व तालुकास्तरावर किशोरी हितगुज मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.
3.     लेकी वाचवा व सक्षम बनवा मिशन-: समाजामध्ये जेंडर जागृती निर्माण होण्यासाठी तसेच मुलींच्या शिक्षणाचे महत्व समजण्यासाठी जिल्हा, तालुका व शाळा पातळीवर लेकी वाचवा व सक्षम बनवा मिशन या बाबत चर्चासत्रांचे आयोजन
4.      मीना मंच उपक्रम -: मुलींना शाळेत दाखल करून प्राथमिक शिक्षण पूर्ण करणे,मुलगा – मुलगी समानतेची भावना निर्माण करणे, मुलीमध्ये नेतृत्वाची व सहयोगाची भावना निर्माण करणेसाठी सन 2006 पासून जिल्हयात मीना मंचची स्थापना करण्यात आली होती.  मीना मंच अंतर्गत जिल्हयात मुलींसाठी मीना मेळावे, महिलांसाठी महिलां मेळावे, दादी –नानी मेळावे आदि उपक्रम घेण्यात आलेले आहेत.
5.      मीना राजू मंच-  शाळा स्तरावर मुलगा मुलगी समानतेची भावना  निर्माण करण्यासाठी मुलींसोबत मुलांचाही सहभाग असणे गरजेचे आहे. यासाठी मीना मंच ऐवजी सन 2012-13 पासून शाळास्तरावर मीना राजू मंचची स्थापना करण्यात आली. मीना - राजू मंच सदस्यांमार्फत शाळा स्तरावर लिंगसमभाव जडणघडण   व लिंगभाव जीवनकौशल्य, शिक्षणाचे महत्व , व्यक्तिमत्त्व विकास , मीना राजू मंच रेडिओ कार्यक्रम आदि उपक्रम शाळा स्तरावर राबविण्यात आले आहेत.
6.    मीना राजू मंच अंतर्गत समता शिक्षा कार्यशाळा-:
जिल्हा व तालुका स्तरावर समता (मीना राजू मंच) संदर्भात दस्ताऐवजीकरण, सनियंत्रण, समता कक्ष, अभ्यासक्रम व लिंगसमभाव या विषयावर सुगमकर्ता शिक्षक, विषयतज्ज्ञ व केंद्रप्रमुख यांच्या  एक दिवशीय कार्यशाळा घेण्यात आल्या. सदर कार्यशाळेसाठी कोरो फॉर लिटरसी, मुंबई व समाज प्रबोधनी संस्थाचे  सदस्य यांनी मार्गदर्शन केले.