वाचन प्रेरणा

                                                               वाचन प्रेरणा दिन 
                              
         बालवयातच मुलांना नियमित वाचनाची सवय व गोडी लागल्यास त्यांना विविध माध्यमांतून ज्ञान मिळेल, ही गरज ओळखून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  दिनांक 15 ऑक्टोबर डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस हा वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा केला जातो. वाचन प्रेरणा दिना निमीत्ताने जिल्हयात खालील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
1.    पुस्तक प्रदर्शने, दिंडी इत्यादी वातावरण निर्मिती कार्यक्रमांचे आयोजन
Ø  कुडाळ तालुक्यातील साळगांव न.1 या शाळेत साळगांव गावातील ग्रंथालयाच्या माध्यमातून ग्रंथ व पुस्तक प्रदर्शन घेण्यात आले. विद्यार्थ्यांची वाचन समृद्धी व त्या वाचनातून जीवन समृद्ध करण्यास कशी दिशा मिळते हे व्याख्यानाच्या माध्यमातून सांगण्यात आले.
Ø  वेंगुर्ले  तालुक्यातील परूळे नं.3 शाळेत पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले.
Ø  वेंगुर्ले तालुक्यातील वेंगुर्ले नं.4 शाळेत पुस्तक दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये शाळेतील विद्यार्थी, पालक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य सहभागी झाले होते.


2.    पालक, ग्रामस्थ, लोकप्रतिनीधी, स्वयंसेवी संस्था यांचा सहभाग व समन्वयासाठीचे प्रयत्न
Ø  वेंगुर्ले तालुक्यातील परूळे कुशेवाडा शाळेमध्ये  शाळा व्यवस्थापन समितीने सर्व शिक्षकांना भारतरत्न ए.पी.जे अब्दुल कलाम यांच्या पुस्तके भेट दिली.
Ø  कणकवली तालुक्यातील 228 शाळांना " श्यामची आई " हे पुस्तक आपल्या दिवंगत वडिलांच्या स्मरणार्थ भिरवंडे केंद्रातील कुंभवडे नं.1 शाळेतील शिक्षिका सौ. कल्पना धाकू मळये यांनी भेट दिले.
3.    चर्चासत्रे, सुसंगत स्पर्धा इ. वाचनपूरक तथा वाचन कट्टा, वाचन कुटी यासारखे प्रोत्साहनपर उपक्रमांचे आयोजन
Ø  वाचन प्रेरणा दिन, हात धुवा दिन व पांढरी काठी दिन यानिमित्ताने जि.प. शाळा कसाल बालमवाडा, ता. कुडाळ येथे सिंधुदुर्ग जिल्हयाचे जिल्हाधिकारी मा. श्री. उदय चौधरी व मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री. शेखर सिंह यांनी भेट दिली.
Ø  सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी नं.1 या शाळेत वाचन प्रेरणा दिना निमीत्ताने  लेखकाचा सहवास हा कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये जेष्ठ लेखिका श्रीम. पद्मा फातर्पेकर  यांचा सहवास विद्यार्थ्याना लाभला. विद्यार्थ्यांनी आपण वाचलेल्या पुस्तकाचे रसग्रहण त्यांच्या समोर सादर केले. शाळेतील विद्यार्थींनी चैताली सावंत व ऋतुजा मोर्ये यांनी श्रीम. पद्मा फातर्पेकर  यांची  मुलाखत घेतली.
Ø  कुडाळ तालुक्यातील पडवे नं.1 येथे वाचन प्रेरणा निमित्त बालकवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळेतील मुलांना आपल्या  स्वरचित कवितांचे सादरीकरण केले.